गावाविषयी माहिती

ग्रामपंचायत तिळगाव   ही महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा  तालुक्यातील एक प्रगतशील ग्रामपंचायत आहे.

सदर ग्रामपंचायत मध्ये  तिळगाव आणि देवगाव   अशी दोन महसूल गावे समाविष्ट आहेत .

१. तिळगाव ग्रामपंचायत हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेले एक ग्रामपंचायत आहे, जेथे प्रामुख्याने मराठी बोलीभाषा बोलली जाते,पिनकोड ४२१३०३ आहे आणि ते वाडा तालुक्याच्या जवळ (सुमारे १५ किमी) आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण पालघर सुमारे 90 किमी दूर आहे, हि ग्रामपंचायत  नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. 

२. २०११ च्या जनगणनेनुसार २१६८ लोकसंख्या आहे ,हे गाव  दक्षिण कोकणातील वाडा तालुक्यात येते आणि एक शांत, ग्रामीण भाग आहे, जिथे शेती आणि स्थानिक जीवनशैली आढळते. 

३.  जास्त प्रमाणत आदिवासी (ST)लोकवस्ती तसेच इतर मागास वर्गीय ( कुणबी  OBC ) लोकवस्ती असून, वाडा तालुक्याच्या  दक्षिणेकडील भागात येते आणि घनदाट जंगल व निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते.

मुख्य माहिती:

सन २०११ च्या जनगणनेनुसार या ग्रामपंचायत ची  लोकसंख्या सुमारे २१६८ आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ५ , अंगणवाडी केंद्रे ०६ , आरोग्य उपकेंद्र १ तसेच समाजमंदिर- १  अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायत क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी हातपंप, विद्युतपंप , विहिरी तसेच काही ठिकाणी  नळपाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत,ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तिळगांव  गावात संत तुकाराम महाराज मंदिर व गावदेवी मंदिर आहे .तिथे दरवर्षी संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन दिना निमित्त अखंड हरीनाम उत्सव साजरा करण्यात येतो,व देवगांव  गावात हनुमान  मंदिर आहे तिथे हनुमान जयंतीला कार्यक्रम घेण्यात येतात.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून  भाजीपाला ,फुले लागवड, कुकुट पालन असे छोटे मोठे व्यवसाय करतात .शेती मध्ये भात हे प्रमुख  पिक घेतली जातात. तसेच हवामानानुसार व त्या त्या हंगामनुसार कडधान्य चे पिक घेतले जाते .तूर,मुग,हरभरा,वाल असे अनेक पिके घेतात.तसेच मोगरा व झेंडू लागवड हि जास्त प्रमाणात दिसून येते.

तिळगांव देवगांव  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत तिळगांव देवगांव मध्ये  संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणत आहे.  

ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.

तिळगांव   ग्रामपंचायत आज वाडा  तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारी ग्रामपंचायत  म्हणून ओळखली जाते.

भौगोलिक स्थान

तिळगांव   ग्रामपंचायत हि वाडा  तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. तिळगावाचे क्षेत्रफळ ६११.५६  हे आर व  देवगांवचे क्षेत्रफळ ३८५.३२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ५१६  कुटुंबे येथे वास्तव्यास असून, पुरुष :- ११०८ स्री :- १०६० असून एकूण लोकसंख्या २१६८ आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने दोन्ही  बाजूला डोंगर असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ४२°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात २५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ८० ते ९० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

ग्रामपंचायत तिळगांव   येथे भात शेती प्रामुख्याने केली जाते.

लोकजीवन

ग्रामपंचायत तिळगांव येथील गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय भात शेती व हंगामी भाजीपाला पिके काही प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह शेळीपालन काही लोक दुग्धव्यवसाय,कुकुटपालन यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि तिळगावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र,गोकुळाष्टमी तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ग्रामपंचायत तिळगांव देवगांव च्या  लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

लोकसंख्या

घटक संख्या
लोकसंख्या २१६८
पुरुष ११०८
स्त्री १०६०
एकूण २१६८

संस्कृती व परंपरा

ग्रामपंचायत तिळगाव देवगांव  गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी,यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.

स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.

प्रेक्षणीय स्थळे

ग्रामदैवताचे मंदिर – गावातील प्रमुख जागृत संत तुकाराम महाराज मंदिर,व गावदेवी मंदिर  गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हनुमान मंदिर  देवगांव  गावात असून तेथे हनुमान जयंतीला उत्सव व कार्यक्रम साजरा करण्यात येतो.

जवळची गावे

ग्रामपंचायत तिळगांव  हे  वाडा तालुक्यातील असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.

आबिटघर,कांबारे,कोने,खुपरी खैरे-आंबिवली हि आसपासची प्रमुख गावे आहेत.